शाओमीने लॉन्च केला ३ कॅमेरेवाला ‘रेडमी नोट प्रो’

redmi
मुंबई : चीनची स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमीने आपला नवा स्मार्टफोन लॉंच केला असून या फोनचे नाव ‘रेडमी नोट प्रो’ असे असून, या फोनमध्ये तीन कॅमेरे आणि ४ जीबी रॅम देण्यात आले आहेत. कंपनीने हा फोन हेलिओ X२० आणि हेलिओ X२५ या २ व्हर्जनमध्ये लॉंच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्य असे की, या फोनमध्ये ३ कॅमेरे आहेत. त्यात उच्च गुणवत्तेच्या दोन रिअर तर, एका फ्रंट कॅमेऱ्याचा समावेश आहे.

दरम्यान, हेलिओ X२० या फोनची किंमत १५ हजार, तर X२५ या फोनची किंमत २० हजार सांगितली जात आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, या फोनमध्ये डीएसएलआर कॅमेऱ्याप्रमाणे या फोनच्या कॅमेऱ्याची क्वालिटी असेल, तसेच हा फोन शाओमीच्या फोनपैकी सर्वात जबरदस्त क्षमतेचा फोन असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, या फोनबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, हा फोन अद्याप भारतात लॉंच न झाल्यामुळे तो भारतात केव्हा येईल याबाबत शिओमीचे चाहते वाट पाहात आहेत.

Leave a Comment