चीनच्या विद्यापीठात रोमान्स कोर्स

romance
चीनच्या नियानजिन विद्यापीठात विद्यार्थ्यांना रोमान्स कोर्स शिकविला जात असून या कोर्समध्ये प्रात्यक्षिके व थिअरी अशा दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश आहे. थिअरी अॅन्ड प्रॅक्टिकल ऑफ रोमँटिक रिलेशन कोर्स असे या कोर्सचे नांव आहे.

या कोर्सचा अभ्यासक्रमही खास आहे. मुली व मुलांसाठी वेगवेगळे धडे आहेत. मुलांनी आपल्याकडे आकर्षित व्हावे यासाठी मुलींनी काय करावे व मुलींना आपले आकर्षण वाटावे यासाठी मुलांनी काय करावे यासाठी चार युक्तीच्या गोष्टी येथे शिकविल्या जाणार आहेतच पण त्याचबरोबर अन्य काही गुपितेही उघड करून शिकविली जाणार आहेत. प्रोफेसर शी रोमान्सचे क्लासेस घेणार आहेत. पॉवर पॉईंट व स्लाईडसच्या मदतीने ते हा विषय शिकविणार आहेत.

मुलांनी आपले व्यक्तीमत्त्व कसे उठावदार बनवायचे, बोलायचे कसे, वागायचे कसे याचे धडे येथे मिळतील तसेच मुलींना कसे दिसावे, शालिनता म्हणजे काय याचे पाठ दिले जातील. मुला मुलींनी एकमेकांना किती व कसे स्वातंत्र्य दिले तर रोमान्स अ्धिक फुलतो हेही येथे शिकविले जाणार आहे.

Leave a Comment