तीनचाकी, वेगवान स्लींगशॉट एसएलआर कार

sling
पोलारिस कंपनीने तीन चाकांवर पळणारी, वजनाने हलकी तरीही अतिवेगवान अशी नवी कार २०१७ स्लींगशॉट एसएलआर या नावाने सादर केली आहे. युनिक
लुक असलेल्या या कारला पुढच्या बाजूला दोन तर मागच्या बाजूला एक व्हील आहे. या कारला २.४ लिटर क्षमतेचे जीएम इकोटेक एलइ डीओएचसी इंजिन दिले गेले असून ते पाच स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशनने जोडले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग घेण्यास या कारला ४.७ सेकंद वेळ लागतो व तिचा टॉप स्पीड आहे ताशी २१० किमी.

या कारसाठी अॅल्युनिनियम पासून बनविलेली मजबूत फोर्जड् व्हील्स दिली गेली आहेत. या टू सीटर कारमध्ये कट अॅन्ड स्यू स्पोर्ट सीटस असून स्पार्को स्टीअरिंग व्हील आहे. इंटिरिअर एलईडी लायटिग कीट, अँटी लॉक ब्रेकींग सिस्टीम, इलेक्ट्राॅनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, प्रोजेक्टर हेडलाईट, एलईडी ब्रेकलाईट, चालकासाठी इलेक्ट्राॅनिक पॉवर असिस्टेड स्टीअरिंग व थ्री पॉईंट सीटबेल्टससह वॉटरप्रूफ सीट आहे. काळा व ऑरेंज तसेच टर्बो सिल्व्हर रंगात ही कार उपलब्ध असून तिची किंमत आहे २८४९९ डॉलर्स म्हणजे १९ लाख रूपये.

Leave a Comment