१६ सप्टेंबरला आयफोन ७ चे लाँचिंग!

iphone-7
मुंबई: सोशल मीडियावर सध्या अॅपल आयफोन ७ बाबत बरीच चर्चा सुरु असून नुकताच या स्मार्टफोनचा नवा व्हिडिओ लीक झाला होता. ज्यामध्ये ३.५mm ऑडिओ जॅकला नवी जागा देण्यात आली आहे. नव्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, अॅपल डिव्हाइसचे नवे नाव आयफोन ७ नाही तर आयफोन ६ SE असणार आहे. कंपनी पुढील वर्षी आपला आयफोन ७ डिव्हाइस लाँच करणार आहे. असेही वृत्त आहे की, सप्टेंबरच्या १६ तारखेपासून नवा आयफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. एक ट्वीट करुन याची माहिती एवान ब्लासने दिली आहे. हा स्मार्टफोन सप्टेंबरच्या १६ तारखेला लाँच करण्यात येईल.

याआधी देखील या स्मार्टफोनबाबत बरीच माहिती समोर आली होती. यामध्ये ड्युल कॅमेरा सेटअप असेल तर वॉटरप्रूफ आणि वायरलेस चार्जिंग असणार आहे. अॅपल यावेळस आयफोनला ए१० चिप आणि ३२ जीबी १२८ जीबी आणि २५६ जीबीचे मॉडेल बाजारात आणू शकते. मीडिया रिपोर्टनुसार या आयफोनमध्ये १२ मेगापिक्सल ड्युल कॅमेरा असू शकतो. तसेच ३ जीबी रॅमही असेल. तसेच नव्या आयफोनमध्ये डार्क स्पेस ब्लॅक ऑप्शनही असण्याची शक्यता आहे. आयफोन लाँचिंग इव्हेंटची घोषणा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते.

Leave a Comment