निधडी छाती असेल तरच चढा या रेस्टॉरंटची पायरी

la-masia
रेस्टॉरंट सुरू करताना मालक लोक अनेक वेगवेगळ्या थिमचा वापर करतात. त्यामागे ग्राहकाने आकर्षित व्हावे व आपला व्यवसाय चांगला चालावा हाच हेतू असतो. मात्र बार्सिलोनातील एक रेस्टॉरंट असे आहे, जेथे केवळ निधड्या छातीचे लोकच आत जाण्याचे डेरिंग करू शकतात. ला मासिया एंकाटडा या नावाचे हे रेस्टॉरंट भूत, प्रेते असल्या थीमवर आधारित आहे.

कोणत्याही रेस्टॉरंटच्या दारात गेले तर तेथील स्वागताची कांही खास पद्धत असते. हे रेस्टॉरंटही त्याला अपवाद नाही. फक्त येथे ग्राहकाच्या स्वागताला रक्ताने माखलेला चाकू घेऊन भूत अथवा प्रेत येते. अर्थात येथील वेटरच भूतांच्या प्रेतांच्या पोशाखात असतात. येथील मनोरंजनाची स्टाईलही थोडी हटके आहे. येथे प्रेतांच्या मध्ये पार्टी साजरी केली जाते. या हॉटेलची कल्पना मालकाचीच आहे. अर्थात येथे पदार्थ कोणते मिळतात हे तेथे गेल्याशिवाय कळू शकणार नाही.

असे सांगतात की ज्या इमारतीत हे रेस्टॉरंट आहे की इमारत शापित आहे. त्यामुळे येथे हाँटेड रेस्टॉरंट सुरू करण्याची कल्पना मालकाला सुचली. १७ व्या शतकातील या इमारतीशेजारी आणखी दोन इमारती होत्या. त्यावरून तेव्हाच्या काळात वाद झाला व हा वाद छापकाटा करून सोडविला गेला. त्यात ज्याची हार झाली त्याने हे घर सोडले व ते घर नंतर पडीक इमारत बनले. तेथेच हे रेस्टॉरंट सुरू केले गेले.

Leave a Comment