चेन्नईच्या रमेशला गुगलची स्कॉलरशीप

app
चेन्नई : समुद्रामध्ये मासेमारी करताना चुकून दुसऱ्या देशात गेलेल्या मच्छिमारांना सागरी सीमांचा अंदाज यावा यासाठी रमेश अद्वय या भारतीय मुलाने अनोखा उपाय शोधला आहे. सागरी सीमांचा अंदाज यावा यासाठी रमेशने अॅप्लिकेशन तयार केले आहे. या अॅप्लिकेशनचे नाव FLET म्हणजेच FishErmen Lifeline Terminal असे आहे. नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिमशिवायही हे अॅप्लिकेशन काम करू शकणार आहे.

हे अॅप्लिकेशन तयार केलेला रमेश चेन्नईच्या नॅशनल पब्लिक स्कूलमध्ये दहावीत शिकत आहे. रमेशच्या या कामगिरीला गुगलनेही सलाम केला आहे. गुगल कम्युनिटी इम्पॅक्टने रमेशचा गौरव केला आहे. गुगलने रमेशला ५० हजार डॉलर म्हणजेच ३३.५७ लाख रुपयांच्या स्कॉलरशीपसाठीच्या अंतिम २० डेव्हलपर्सच्या यादीत समाविष्ट केले आहे.

Leave a Comment