अवघ्या ५ मिनीटांमध्ये रेल्वे स्टेशनवर मिळणार पिझ्झा

pizza
मुंबई : आता आयआरसीटीसीही रेल्वेच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या स्वप्नाबरोबरच प्रवाशांना त्याच वेगात खाणे पुरवण्यासाठी सज्ज झाली असून पुढील काही दिवसात आयआरसीटीसी रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे स्टेशनवर फुड मेकिंग मशीन बसवण्याच्या विचारात आहे. याची सुरुवात एटीपी मशीनने म्हणजेच एनी टाईम पिझ्झा देण्याच्या सर्व्हिसने होणार आहे. पाच मिनीटांमध्ये हा पिझ्झा मिळेल असा दावा आयआरसीटीसीने केला आहे.

मुंबईच्या नितेश ठक्कर यांनी आईआरसीटीसीच्या खास मशीनसाठी मेहनत घेतली आहे. या पिझ्झा मेकींग मशीनची मुळ संकल्पना ही नेदरलेंडची आहे. पिझ्झा सोबतच पुढील काळआत आणखी काही खाद्य पदार्थ तयार करता येतील यासाठीही काम सुरु आहे.एनी टाईम पिझ्झा मशीनमुळे रेल्वे प्रवाशांना कमीत कमी वेळेत शुद्ध आणि स्वादिष्ट पिझ्झा मिळणार आहे. सुरुवातीला ही मशीन मुंबईच्या वर्दळीच्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे.

Leave a Comment