देशातील सर्वाधिक खपाची स्कूटर ठरली अॅक्टिव्हा

activa
नवी दिल्ली : गेल्या सहा महिन्यात भारतातील सर्वाधिक खपाची स्कूटर होण्याचा मान होंडाच्या अॅक्टिव्हाला मिळाला आहे.

होंडा कंपनीने २०१६च्या पहिल्या सहा महिन्यात १३.३८ लाख अॅक्टिव्हांची विक्री केली आहे. सर्वाधिक खपाच्या हिरो स्प्लेंडरच्या खपापेक्षा होंडाने सुमारे १.०४ लाख स्कूटर जास्त विकल्या आहेत. होंडाने गेल्या वर्षी याच काळात १.९७ लाख अॅक्टिव्हांची विक्री करत बाजी मारली होती. १७ वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या या स्कूटरने आजपर्यंत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. या स्कूटरला बरेच पुरस्कारही मिळाले आहेत.

स्टाईल, टेक्नॉलॉजी आणि मायलेज या सर्वच पातळ्यांवर बाजी मारत होंडा अॅक्टिव्हाने स्वतःचा एक मोठा ग्राहकवर्ग तयार केला आहे. होंडा अॅक्टिव्हा ही विश्वसनीयता, सुविधा आणि स्टाईल यांचा सुरेख संगम असून ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असे होंडाचे वरिष्ठ उपाध्यक्ष यादविंदर सिंग गुलेरिया म्हणाले. २००१साली होंडा कंपनीने अॅक्टिव्हा बाजारात आणली होती. बाजारात आल्यापासून अॅक्टिव्हा नेहमीच सर्वाधिक खपाची स्कूटर म्हणून ओळखली गेली आहे.

Leave a Comment