फेसबुक मेसेंजरने ओलांडला एक अब्जाचा टप्पा

facebook
सॅन फ्रान्सिस्को : आता एक अब्ज युजरचा पल्ला फेसबुकच्या मेसेंजर अॅपने गाठला असून फेसबुकच्याच कुटुंबाचा फेसबुक मेसेंजर हे एक भाग असून संकेतस्थळापेक्षाही जास्त वेगाने या अॅपची लोकप्रियता वाढत असल्याची माहिती फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

आज आधुनिक युगातील या एक अब्ज युजर्सच्या प्रवासात संवादाच्या माध्यमाला आणखी उत्तम करण्यासाठी आमचे प्रयोग सुरू आहेत. युजर्सना व्यवसायाच्या दृष्टीने अधिक चांगल्या पध्दतीने कसा संवाद साधता येईल यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे फेसबुकचे उपाध्यक्ष डेव्हिड मॅरकस यांनी सांगितले.

फेसबुकचे १.६ अब्ज युजर्स असून, २०१४ मध्ये फेसबुक फॅमिलीने व्हॉट्‌सअॅप आणि इतर मेसेजिंग अॅप २०अब्ज डॉलरमध्ये खरेदी केल्या आहेत. याशिवाय फेसबुक फॅमिलीत ५० कोटी युजर्स असलेले आणि छायाचित्र शेअर करण्याची सुविधा असलेले इन्स्टाग्राम आणि आभासी वास्तवाचा अनुभव देणाऱ्या ऑक्‍युलसच्या सेवांचाही समावेश आहे. फेसबुकच्या व्यावसायिक उपयोगासाठी मेसेंजरद्वारे बोटस्‌ नावाचे एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यातून सबंधित क्षेत्रातील बातम्यांची देवाण-घेवाण करता येते. मेसेंजरमध्ये आज असे १८ हजार बोटस्‌ उपलब्ध आहेत जे तुमच्या व्यवसायाला वृध्दिंगत करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. फेसबुकच्या मेसेंजरच्या मदतीने युजर्सच्या चॅटिंगमधील जाहिरातींशी सबंधित मजकूरावर लक्ष ठेवले जाते आणि त्याच्याशी सबंधित जाहिराती फेसबुकवरील टाईमलाईनशेजारी युजर्सला दिसतात. यामुळे सबंधित व्यावसायिकालाही त्याचा फायदा होतो. भविष्यात कंपनीकडून या फेसबुक साखळीचा वापर करून एखाद्या जाहिरातीचे व्हेक्‍टर्स युजर्सला कसे दिसतील यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. मात्र या प्रक्रियेला पुरेसा वेळ लागणार आहे, अशी माहिती मॅरकस यांनी दिली.

Leave a Comment