सैराटने खरोखरच तुमचे वाटोळे केले का?

sairat
मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरणाऱ्या सैराट चित्रपटावर सध्या विविध राजकीय पक्षांकडून होणारी टीका खुपच लाजिरवाणी आहे. सैराटमुळे आजच्या युवा पिढीचे वाटोळे झाले असे वक्तव्य ज्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले असे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे विजय शिवतारे यांनी केले. त्यानंतर राज्यात बलात्काराचे प्रमाण सैराट सारख्या चित्रपटांमुळे वाढले असे वक्तव्य भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी केले. तर आता राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी देखील आजची युवा पिढी ही केवळ सैराट मुळे बिघडली असे म्हटले आहे. पण खरचं सैराटमुळे आजची पिढी बिघडली आहे का?

सैराटवर आज अनेक आरोप झाले पण तरी देखील आजच्या युवा पिढीच्या म्हणा अथवा मराठी माणसाच्या पसंतीला सैराट हा १०० टक्के खरा उतरला. दरम्यान काही दिवसात सैराटवर होणारे आरोप खुपच गंभीर आहेत. पण आजवर बॉलीवूडमध्ये अंगप्रदर्शन करून भरमसाठ गल्ला जमवणारे चित्रपट खूप येऊन गेले. एवढेच नाहीतर पोर्नस्टार सनी लिओनचे चित्रपट देखील ५०-६० कोटी कमवतात. त्यावेळी कोणी म्हणत नाही की हिच्यामुळे बलात्काराच्या घटनात वाढ झाली. मग हा दुजेभाव सैराट किंवा अन्य मराठी चित्रपटाबाबत का? आज मराठी चित्रपट यशाच्या शिखरावर पोहचत आहे ही माझा पेपरसाठी आणि मराठी रसिकांसाठी गर्वाची बाब आहे. पण याबाबत आपले राज्य सरकार एकीकडे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठोकतात आणि त्यांचे कार्यकर्ते काही वेगळेच वक्तव्य करतात. सैराटमुळे आज जर कोणाचे वाटोळे झाले असेल तर फक्त बॉलीवूडचे.

आंतरजातीय विवाहाला सैराटने प्राधान्य दिले. त्यात दिग्दर्शकाची काही चूक नाही. आज देशात ज्याप्रकारे ऑनर किलिंग प्रकार वाढत आहे त्यावर नागराज मंजुळे यांनी प्रकाश टाकला आहे. याबाबत मंजुळे यांनी चित्रपटामुळे कोणाचे वाटोळे झाले हे प्रेक्षकच ठरवतील. तरी देखील आजच्या घडीला १०० कोटीपेक्षा जास्त गल्ला जमवत मराठी सिनेसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापित केलेल्या सैराटचे माझापेपर तर्फे हार्दिक अभिनंदन!

Leave a Comment