आजपासून शाओमीची ३ दिवस खास ऑफर

xiaomi
मुंबई: भारतात येऊन चायनीज कंपनी शाओमीला दोन वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त कंपनीने तीन दिवसांसाठी डिस्कउंट ऑफर आणि सेल जाहीर केला आहे. आजपासून हा सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये शाओमीचे स्मार्टफोन खरेदी करताना किंमतीत स्पेशल डिस्काउंट तसेच १ रुपयांत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

आपल्या रजिस्टर यूजर्ससाठी शाओमी काही ठराविक स्मार्टफोन मात्र १रुपयांना उपलब्ध करून देणार आहेत. आज १० शाओमी MI5 आणि 100 MI 20000mAhचा पॉवर पॅक या ऑफरमध्ये सहभाग आहे. तर उद्या २१ जुलैला १० शाओमी रेडमी नोट ३ आणि १० mi बँड हे कार्निव्हल ऑफरमध्ये मिळणार आहे. तर या सेलच्या शेवटच्या दिवशी २२ जुलैला १० शाओमी mi max आणि १०० mi ब्लूटूथ स्पीकर ऑफरमध्ये मिळणार आहे. दर दिवशी दुपारी २ वाजता फ्लॅश डील सेल सुरु होणार आहे. या सेलचा लाभ घेण्यासाठी तुमचे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. या रजिस्ट्रेशची माहिती कंपनीने शाओमीने आपल्या फेसबुक पेजवर उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय शाओमीचा 10000mAhचा पॉवर पॅक, Mi ear कॅप्सूल हेडफोन, Mi in ear हेडफोन डिस्काउंटमध्ये मिळेल.

Leave a Comment