आता तीन दिवसात मिळणार पॅनकार्ड

pan-card
नवी दिल्ली- आता पॅनकार्ड बनवण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. तुम्हाला तुमचे पॅनकार्ड केवळ तीन दिवसात बनवून मिळणार आहे. तसा निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने घेतला आहे. इज ऑफ डुइंग बिझनेस आणि जास्तीत जास्त लोकांना कराच्या जाळ्यात आणण्याच्या दृष्टीने सीबीडीटीने हे पाऊल उचलले आहे. कंपन्यांना तर एकाच दिवसात पॅनकार्ड मिळेल.

सीबीडीटीचे अध्यक्ष अतुलेश जिंदाल यानी सांगितले की, कंपन्यांना आता एक दिवसात टॅनकार्ड मिळवण्यात काहीच अडचण येणार नाही. डिजिटल सहीनेही ते आता टॅन क्रमांकासाठी अर्ज करू शकतील. सामान्य लोकांचे पॅनकार्ड आधार क्रमांकाच्या द्वारे झटपट तपासले जाईल आणि तीन ते चारच दिवसांत त्यांना पॅनकार्ड मिळणार आहे. सध्या पॅनकार्ड जवळपास १५ ते २० दिवसांत मिळते. एनएसडीएल आणि यूटीआयएसएलच्या वेबसाईटवर पॅन क्रमांकासाठी अर्ज दिल्यावर आधार क्रमांकाच्या आधारे पडताळणी केली जाईल. त्यातून वेळेची मोठी बचत होणार आहे.

जिंदाल यांच्या अनुसार आता आधार क्रमांकाची पडताळणी केली जाणार असल्याने बनावट पॅनकार्ड बनवण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे. देशातील हजारो लोकांनी एकापेक्षा अधिक पॅनकार्ड बनवून घेतले आहे. जिंदाल म्हणाले की, आम्ही अशी ११ लाख पॅनकार्ड रद्द केली आहेत.

Leave a Comment