स्वस्त झाले पेट्रोल आणि डिझेल

petrol
नवी दिल्ली – दिवसेंदिवस महागाई वाढत असलेल्या महागाईमुळे होरपळणा-या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे.

पेट्रोलच्या दरामध्ये तेलकंपन्यांनी २ रुपये २५ पैशांनी कपात केली आहे तर डिझेलच्या दरामध्ये ४२ पैशांनी कपात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर काल मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

यापूर्वी १ जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आली होती. तर त्याआधी १५ जून रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ करण्यात आली होती. इंधनाचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर दर १५ दिवसांनी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दराचा आढावा घेतला जातो. त्यानुसार आजचे हे दर बदललेले आहेत.

Leave a Comment