मोटोरोलाने लाँच केला ई सीरीजमधील नवा स्मार्टफोन

moto
नवी दिल्लीः ई-सीरीजचा नवा फोन मोटो ई३ हा स्मार्टफोन मोटोरोला कंपनीने लाँच केला असून हा वॉटरप्रूफ स्मार्टफोन आहे. मात्र या फोनची रॅम आणि स्टोरेज किती असेल याबाबतचा खुलासा कंपनीने केलेला नाही.

काही दिवसांपूर्वीच मोटोरोलाने मोटो जी सीरीजचा मोटो जी ४ आणि मोटो जी ४ प्लस हे जबरदस्त फीचर्सचे दोन फोन लाँच केले होते. बाजारात या दोन्ही फोन्सची सध्या जोरदार विक्री चालू आहे. त्यातच कंपनीने हा बजेट स्मार्टफोन आणला आहे.

मोटो ई ३मध्ये ४.५ इंचाची स्क्रीन, एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सल रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन वॉटर प्रूफ असून याला स्क्रीन प्रोटेक्टर देण्यात आले आहे. हा फोन सध्या केवळ ब्रिटनमध्येच उपलब्ध करण्यात आला असून भारतात हा फोन कधी येणार याबाबत उत्सुकता आहे. ब्रिटनमध्ये या फोनची किंमत ८ हजार ७५६ रुपये आहे.

Leave a Comment