मिनी फॅनच्या मदतीने उडत्या केसांसह काढा सेल्फी

selfie
वारा नसतानाही भुरूभुरू उडणार्‍या केसांसह सेल्फी काढायचा असेल तर त्यासाठी मिनी फॅन्स बाजारात दाखल झाले आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या अनेक डिव्हायसेसमुळे स्मार्टफोन अधिक स्मार्ट बनत आहेत त्यात या सेल्फीक्रेझींसाठी आलेल्या मिनी फॅनची भर पडली आहे.

हा फॅन मायक्रो यूएसबी डिव्हाईसने स्मार्टफोनच्या ऑडिओ जॅकला कनेक्ट करता येतो. कनेक्ट करताच फॅन सुरू होतो. फॅनसाठी फोनची बॅटरीच वापरली जाते. फॅन ऑन असताना सेल्फी घेताना केस उडतानाचे सेल्फी घेता येतात. कोणत्याही ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवर फक्त ८० रूपयांत हा फॅन मिळतो आहे. त्याचा उपयोग व्हीडीओसाठीही करता येतो आहे. सेल्फीसह व्हिडीओ घेताना युजरच्या आसपास हलका वारा वाहतोय हे दिसण्यासाठी हा फॅन उपयुक्त ठरतो आहे.

Leave a Comment