मार्केटिंग शुल्कात स्नॅपडीलने केली तब्बल १८% पर्यंत कपात

snapdeal
मुंबई – ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी महत्वाची हि बातमी असून ऑनलाइन व्यापार क्षेत्रामध्ये आघाडीची कंपनी असलेल्या स्नॅपडील कंपनीने आपल्या मार्केटिंग शुल्कामध्ये कपात करण्याचे ठरविले असून आपल्या डिजिटल, इलेक्ट्रॉनिक्स, महिलांची फॅशन, जलदगती ग्राहकवस्तू उत्पादने यासह सुमारे १२० उपवर्गांच्या शुल्कामध्ये कपात करण्याचे स्नॅपडील करणार आहे. मात्र, त्याचवेळी ३० उपविभागामधील मार्केटिंग शुल्क वाढविण्यात येणार आहे.

स्नॅपडील कंपनीने हे पाऊल अधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उचलले आहे. नवे शुल्क या आठवड्यापासून लागू होणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. तसेच विक्रेत्यांकडून आलेल्या प्रतिसादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कपात ०.२ टक्क्यांपासून १८ टक्क्यांपर्यंत लागू केली जाणार आहे. स्नॅपडीलच्या या नव्या धोरणामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment