तब्बल ७ हजार ५४८ वादकांनी केली विश्वविक्रमाची नोंद

record
फ्रँकफर्ट: नुकतीच जर्मनीची आर्थिक राजधानी असलेल्या फ्रँकफर्टमध्ये एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली असून एका फुटबॉल स्टेडियमवर तब्बल ७ हजार ५४८ वादकांनी एकत्र येऊन सर्वात मोठ्या ऑर्केस्ट्रा वादनाचा विक्रम केला आहे. हा सगळा लवाजमा एका २८ वर्षीय संगीत शिक्षकाने गोळा केला.

याआधी २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये ७ हजार २२४ वादकांनी सर्वात मोठ्या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम केला होता. त्यांचा विक्रम जर्मनीतल्या या खुल्या मैफलीत मोडीत काढण्यात आला.

Leave a Comment