सोने ३२ हजारी

gold
मुंबई – सोन्यावर काही दिवसांपूर्वी ब्रेक्झिटचा झालेला परिणाम आणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता या सगळ्यामुळे सोने पुन्हा एकदा महागले आहे. प्रति तोळा ३२ हजार रुपयांवर सोन्याचा दर पोहोचला आहे. सोन्याच्या दरातील मागील चार वर्षातील सर्वाधिक वाढ आहे. बुधवारी ३१ हजार ९५३ रुपयांचा भाव सोन्याला मिळाला होता. सोन्याच्या किमतींत १७ टक्के तर चांदीच्या दरात २८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे कळते. जागतिक बाजारपेठेत ही परिस्थिती कायम राहिल्यास येत्या एक-दोन महिन्यात सोन्याच्या किमतींमध्ये अशीच वाढ होऊ शकते, असे मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

भारतीयांमध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून सोने हा एक चांगला पर्याय मानला जात असल्यामुळे गेल्या काही महिन्यात सोन्याच्या खरेदीत वाढ झाल्याने या किमतींतही वाढ होता दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर १३६० डॉलर प्रति औंस (अंदाजे साडेतीन तोळे) स्तराला पोहोचले आहे. जर सोन्याने १४०० डॉलर प्रति औसंचा स्तर ओलांडला तर भारतात हा दर ३४,००० हजारांच्या घरात पोहोचेल, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे.

सोन्याच्या दरात अशी काही दिवसांत झालेली वाढ गिऱ्हाईकांना अतिशय धक्का देणार आहे. नुकतेच लग्नाचे दिवस संपले असले तरीही सोन्यात झालेली ही वाढ चिंतानक असल्याचं सांगितलं जातंय. तसेच सोन्याचा दर ३३५०० रूपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment