भारत सर्वाधिक आनंदी देशांच्या यादीत ११८ व्या स्थानी

happy
नवी दिल्ली – जगातील सर्वाधिक आनंदी देशांची यादी जाहीर झाली असून यामध्ये भारत ११८ व्या स्थानी आहे, तर जगातील सर्वात बलाढ्य देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमेरिकेलाही १३ वा क्रमांक मिळाला आहे. पहिल्या पाच क्रमांकांवर अनुक्रमे डेन्मार्क, स्वित्झर्लंड, आईसलँड, नॉर्वे आणि फिनलंड या देशांनी स्थान पटकावले आहे. याचाच अर्थ आर्थिक विकास किंवा अन्य बाबींचा आनंदाशी फारसा संबंध नाही असेही म्हणता येईल. जर्मनी, ब्राझील अनुक्रमे १६ व्या व १७ व्या क्रमांकावर आहेत. फ्रान्स ३२ व्या, स्पेन ३७ व्या, इटली ५० व्या, जपान ५३ व्या, रशिया ५६ व्या आणि चीन ८३ व्या क्रमांकावर आहे.

Leave a Comment