१५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ४५० किमीचा प्रवास

car
मुंबई : बॅटरीवर चालणारी एसयूव्ही कारची निर्मिती कार निर्मितीत नावाजलेली कंपनी स्कोडा करणार असून बॅटरीवर चालणारी कार १५ मिनिट चार्ज केल्यानंतर ४५० किमीपर्यंत धावणार आहे.

फॉक्सवेगनच्या एमईबी बॅटरी प्लॅटफॉर्मवरच स्कोडाच्या एसयूव्हीची निर्मिती केली जाणार आहे. फॉक्सवेगन कंपनीही स्कोडासोबत आगामी काळात प्रीमियम आणि हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रिक कार बाजारात आणू शकते, असे म्हटले जात आहे. २०२० साली ही एसयूव्ही स्कोडा कंपनी लॉन्च करणार आहे, २०२५ सालापर्यंत ३० नव्या इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार आणण्याच्या विचारत स्कोडा कंपनी आहे. २०१९ पर्यंत स्कोडा सुपर्ब नव्या कोडिएक एसयूव्हीचे हायब्रिड व्हर्जन आणणार आहे.

ही कार पेट्रोल-डिझेलवर चालणारी नसेल तर या गाडीचे किंमत जास्त असेल असं तुम्हाला वाटत असेल, पण पेटोल-डिझेल कारच्या किंमतींपेक्षा या एसयूव्हीची किंमत कमी असेल.

Leave a Comment