एलजीचे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च

lg
मुंबई : दोन नवे स्मार्टफोन कमी बजेटचे स्मार्टफोन बनवणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एलजी कंपनीने लॉन्च केले असून एक्स ५ आणि एक्स स्कीन असे दोन स्मार्टफोन एलजीने बाजारात आणले आहेत. हे स्मार्टफोन सध्या दक्षिण कोरियात लॉन्चे केले असून, ते लवकरच भारतात लॉन्चे केले जाणार आहेत.

एलजी एक्स ५ स्मार्टफोनची किंमत जवळपास ११ हजार ७०० रुपये असून, एलजी एक्स स्कीनची किंमत जवळपास १३ हजार ५०० रुपये आहे.
कसा आहे एलजी एक्स ५ – यात स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची आणि ७२०×१२८० पिक्सेल रिझोल्यूशनचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर १३ मेगापिक्सेलचा रिअर आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा या फोन देण्यात आला आहे. याच्या बॅटरीची क्षमता २८००mAh ऐवढी असून यात २जीबी रॅम, १.३ GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि १६ जीबीची इनबिल्ट मेमरी त्याचबरोबर ४जी LTE ,ब्लूटूथ, वाय-फाय अशा कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आल्या आहेत.

कसा आहे एलजी एक्स स्कीन – यात स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा आणि ७२०×१२८० पिक्सेल रिझोल्यूशनचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर ८ मेगापिक्सेलचा रिअर आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा या फोन देण्यात आला आहे. याच्या बॅटरीची क्षमता २८००mAh ऐवढी असून यात १.५जीबी रॅम, १.३ GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि १६ जीबीची इनबिल्ट मेमरी त्याचबरोबर ४जी LTE ,ब्लूटूथ, वाय-फाय अशा कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment