फ्लिपकार्ट देणार प्रॉडक्ट खरेदीसाठी कर्ज ?

flipkart
मुंबई : ‘बिग बिलियन डे’ इव्हेंटमध्ये बदल करण्याच्या तयारीत देशातील सर्वात मोठी ऑनलाईन मार्केटप्लेस फ्लिपकार्ट असून ‘बिग बिलियन डे’ ऑक्टोबरमध्ये सेल सुरु होणार आहे. फ्लिपकार्टकडून प्रॉडक्ट खरेदीसाठी ग्राहकांना कर्जही उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची चर्चा असून फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डे’ सेलचे हे तिसरे वर्ष आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ग्राहकांना प्री-अॅप्रूव्ह्ड कर्ज देण्यासाठी फ्लिपकार्टने फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सोबत चर्चाही सुरु केली आहे. त्याचवेळी ‘बाय नाऊ, पे लेटर’ स्कीम आणण्याची तयारी फ्लिपकार्ट करत आहे. सणांचे दिवस ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्ससाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे फ्लिपकार्टने जोरदार तयारी सुरु केली आहे.

Leave a Comment