इंटेक्सचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच!

intex
मुंबई: नुकताच अॅक्वा क्लासिक स्मार्टफोन सीरीज भारतीय स्मार्टफोन कंपनी इंटेक्सने लाँच केली होती. आता कंपनीने त्यांचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. अॅक्वा ३जी प्रो क्यू स्मार्टफोन लाँच केला असून याची किंमत २,९९९ रु. आहे.

कंपनीने हा स्मार्टफोन वेबसाइटवर लिस्ट केला असून अॅक्वा ३जी प्रोचे हा फोन अपडेटेड व्हर्जन आहे. या स्मार्टफोन अनेक फीचर देण्यात आले असून यामध्ये ४ इंचाचा डिस्प्ले असून याचे रिझोल्यूशन ४८०×८०० पिक्सल आहे. तसेच यामध्ये १.२ क्वाड कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे. ५१२ एमबी रॅम देण्यात असून यात ४ जीबीची इंटरनल मेमरी आहे. या स्मार्टफोनमध्ये २ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, तर ०.३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये १३००mAh क्षमतेची बॅटरी आहे. तर कनेक्टिव्हीटीचा विचार केल्यास ३जी, जीपीएस, ब्ल्यूटूथ, वाय-फाय, यूएसबी यासारखे फीचर आहेत.

Leave a Comment