आता २४ तास करा बाजारहाट

modi
नवी दिल्ली – आज झालेल्या केंदीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एका अशा प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे ज्यामुळे देशभरातील दुकाने आणि मॉल्सला पूर्ण एक वर्षासाठी आणि आपल्या सुविधेनुसार दुकान आणि मॉल्स खोलने आणि बंद करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंदीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शॉप्स एंड इस्टॅब्लिश्मेंट विधेयकाला मंजूर करण्यात आले आहे.

या नव्या विधेयकानुसार रात्रपाळीच्या वेळेत योग्य ती सुरक्षा उपलब्ध असल्यास महिलांना देखील नियुक्त करण्यास अनुमती देण्यात येईल. यामध्ये कर्मचाऱ्यांचे पिण्याचे पाणी, कँटीन, लहान मुलांसाठी पाळणाघर आणि त्वरित प्रथमोपचार अशा सुविधांवर जोर देण्यात आले आहे.

Leave a Comment