इंटेक्सने लाँच केला ४४४४ रुपयांचा अॅक्वा क्लासिक स्मार्टफोन

intex
मुंबई: अॅक्वा सीरीजमधील एक नवा स्मार्टफोन अॅक्वा क्लासिक स्मार्टफोन कंपनी इंटेक्सने लाँच केला असून अवघी ४,४४४ रुपये ऐवढी या स्मार्टफोनची किंमत आहे. हा फोन कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे.

ड्यूल सिम सपोर्टिव्ह इंटेक्स अॅक्वा असणार आहे. यामध्ये ५ इंचाची स्क्रीन असून ज्याचे रिझोल्यूशन ४८०×८५४ पिक्सल आहे. यामध्ये १.२GHz क्वाड कोअर प्रोसेसर आहे. तर १ जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले असून यामध्ये ३२ जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ०.३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तर याची बॅटरी क्षमता २१००mAh आहे. तसेच यामध्ये ३जी, ब्ल्यूटूथ, वायफाय अशा कनेक्टीव्हिटीही देण्यात आले आहे.

Leave a Comment