जुलैच्या मध्यात आरबीआय गर्व्हनरची निवड होणार

rbi
सध्याचे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांचा कार्यकाल सप्टेंबरमध्ये समाप्त होत आहे. त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार ही चर्चा सध्या जोरात सुरू असताना नवीन गर्व्हनरची निवड संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केली जाईल अ्से खात्रीलायक सूत्रांकडून समजते. जुलैच्या मध्याला नवीन गर्व्हनरचे नांव जाहीर केले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

राजन यांनी दुसरी टर्म घेणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकारी निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. आरबीआयचे माजी उपगव्हर्नर राकेश मोहन यांचे नांव सध्या तरी आघाडीवर असून ते सध्या वॉंशंग्टन मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत भारताचे कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहेत. अन्य नावात एसबीआयच्या अरूंधती भट्टाचार्य, सुबीर गोकर्ण, शक्तीकांत दास यांची नांवे आहेत. नवीन गर्व्हनरची निवड पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याशी विचार विनिमय केल्यानंतरच होणार आहे.

Leave a Comment