एचपीने बनवला जगातील सर्वात स्लीम लॅपटॉप

hp
मुंबई : अॅपलच्या मॅक बुक एअरची आजपर्यंत जगातील सर्वात स्लीम लॅपटॉप म्हणून गणना होत होती. पण आता एचपीने स्पेक्टर या नावाने सर्वात स्लीम लॅपटॉप बनवल्याचा दावा केला असून हा लॅपटॉप कंपनी आज भारतात लाँच करणार आहे.

एचपी स्पेक्टरची जाडी १.४ मिलीमीटर आहे. तसेच १३ इंचाच्या डिस्पले असणाऱ्या लॅपटॉपच्या रेंजमध्ये कंपनीने एचपी स्पेक्टर लॅपटॉपला १३.३ इंचाचा डिस्प्ले बनवला आहे. या लॅपटॉपमध्ये इंटेलच्या आय ५ आणि आय ७ प्रोसेसर बसविण्यात आले आहेत. तसेच या लॅपटॉपमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीची हार्डडिस्क देण्यात आली आहे. याच्या बॉडीसाठी अॅल्यूमिनीअम वापरण्यात आले असून याचा बॉटमचा भाग कार्बन फायबरने बनवण्यात आला आहे. याच्याशिवाय लॅपटॉपमध्ये यूएसबी टाइपचे सी पोर्टही लावण्यात आले आहेत. एचपी स्पेक्टरची लाँचिंगची किंमत ७८,२८२ रुपये देण्यात आली आहे.

Leave a Comment