अनोख्या रिज्युमेमुळे अधिकारी प्रभावित, मुलाखत न घेताच दिला जॉब

sumukh-mehta
मुंबई : चांगला जॉब मिळवणे आजच्या स्पर्धेच्या युगात जरा कठिणच आहे. तुमच्या रिज्यूमवर तुमचे बरच काही अवलंबून असते. पण तुम्ही कधी २० पानांचा रिज्युमे पाहिला नसेल. हा तुम्हाला खूपच मोठा वाटत असला तरी एका युवकाला याच रिज्यूमेमुळे मुलाखत न घेताच जॉब मिळाला आहे.

एमबीए केलेल्या सुमुख मेहताने जवळपास १६० रिज्यूमे बनवले आहे. पण त्याने जेव्हा तेव्हा तो काहीतरी अनोखाच होता. लोकप्रिय जीक्यू मॅग्जीनमध्ये त्याने मार्केटिंग हेडच्या पोस्टसाठी अर्ज केला. त्याच्या या रिज्युममध्ये त्याने २० पानांवर त्याच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या २० खास गोष्टी त्याने दाखवल्या.
resume
या रिज्यूममध्ये फोटो शूट्स, ग्राफिक डिजाइन आणि कंटेंट रायटरचा समावेश करत त्याने त्याचा रिज्युम एका मॅगजिन सारखाच बनवला. त्याची ही भन्नाट आयडिया जीक्यू मॅगजिनचे ब्रिटिश एडिटर-इन-चीफ यांना इतकी आवडली की त्यांनी त्याची मुलाखत न घेताच जॉब ऑफर केली.

Leave a Comment