वनप्लस ३ मध्ये सापडली प्री लोडेड ‘त्या’ क्लिप्स

oneplus
नवी दिल्लीः नुकत्याच लाँच झालेल्या वनप्लस ३ या फोनविषयी धक्कादायक माहिती समोर आली असून प्री लोडेड पॉर्न क्लिप वनप्लस ३ मध्ये मिळाली असल्याचे एका वापरकर्त्यांने सांगितले आहे.

जास्त फीचर्स आणि कमी किंमतीसाठी वनप्लस ३ हा फोन ओळखला जात आहे. मात्र कोणी कल्पनाही केली नसेल असा प्रकार एका ग्राहकासोबत घडला असल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. एका वापरकर्त्याने फोन खरेदी केल्यानंतर या फोनमध्ये प्री लोडेड पॉर्न क्लिप असल्याचे रेडिट या सोशल साईटवरुन सांगितले आहे. मात्र वापरकर्त्यांने अजबच तक्रार केली आहे. या फोनमध्ये पॉर्न क्लिप दिल्या याला आक्षेप नाही, तर त्या एचडीमध्ये नाही दिल्या, या गोष्टीवर वापरकर्त्याने आक्षेप घेतला आहे. फोनमध्ये कंपनीकडूनच पॉर्न क्लिप कशा येऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित होताच, वापरकर्त्यांने केलेल्या या अजब तक्रारीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान वनप्लसच्या वतीने या प्रकरणावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Leave a Comment