इस्रोच्या २० उपग्रहांची एकचवेळी गगनभरारी

isro
बंगळुरू – भारतीय अंतराळ संशोधन संस्था असलेल्या इस्रोच्या एका ऐतिहासिक मिशनचे काऊंटडाऊन सुरू झाले असून २२ जून रोजी आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतिश धवन केंद्रातून प्रक्षेपण होणाऱ्या २० उपग्रहांचे ४८ तास पूर्वीचे काऊंटडाऊन आज सुरु झाले आहे. पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल पीएसएलवी-सी ३४ चा वापर या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी करण्यात येणार आहे. त्यामध्ये भारताचे भू-सर्व्हेक्षण अंतराळ यान काटरेसॅट-२ चा समावेश आहे.

अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण स्थानावरुन बुधवार २२ जून सकाळी ९.२६ मिनिटांनी रोजी प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या मोहिमेशी संलग्नीत समिक्षा समिती आणि प्रक्षेपण अधिकारी मंडळाने सोमवारी या काऊंटडाऊनसाठी परवानगी दिल्याचे इस्रोतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आज सकाळी ९.२६ मिनिटांनी या मोहिमेचे काऊंटडाऊन सुरू झाले असून बुधवार २२ जून रोजी सकाळी ९.२६ मिनिटांनी पीएसएलव्ही-सी३४, काटरेसॅट-२ या मालिकेतील उपग्रहांच्या प्रक्षेपणास मंजुरी देण्यात आली आहे.

Leave a Comment