डॉक्टरांनी चक्क आयसीयूत पार्क केली गाडी

icu
राजनांदगांव – तसे पाहायला गेले तर प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये पार्किंगसाठी पर्याप्त जागेची व्यवस्था केलेली असते. पण येथील महाशय डॉक्टर साहेबांनी आणि येथील कर्मचाऱ्यांनी चक्क आपल्या पार्किंगची व्यवस्था वेगळ्या पद्धतीने केली आहे. येथील रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी आयसीयूच्या परिसरातच पार्किंग केल्यामुळे येथील रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत आणि तरी देखील येथील मुजोरपणा रोखण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.

काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयाला येथील जिल्हाधिकारी मुकेश बंसल यांनी भेट दिली होती आणि त्यांनी हा नजरा पाहिल्यानंतर रुग्णालयाचे अधीक्षक यांनी ताबडतोब गाड्यांचा राडारोडा हटविण्यास सांगितला होता. पण जिल्हाधिकार्‍यांची पाठ फिरताच त्यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवण्यात आली.

Leave a Comment