आता फेसबुक मेसेंजर देखील देणार ‘बर्थ डे’ नोटिफिकेशन

facebook
नवी दिल्ली – रोज नवनवीन सुविधा फेसबुकच्या संशोधन सेंटरकडून उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आता वाढदिवसाचे नोटिफिकेशन फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून देण्यास फेसबुकने सुरुवात केली आहे.

महिन्याला ९० कोटींच्या दरम्यान फेसबुक मॅसेंजर वापरणाऱ्यांची संख्या असून या अॅपची अद्यावत श्रेणी पाहता ही संख्या निश्‍चितच वाढणार आहे. या अॅपमध्ये बिजनेस चॅट्‌स, रोजच्या बातम्या, व्हिडिओ कॉलिंगची सुविधा यामुळे युजर्सच्या पसंतीस ते उतरले आहे. मेसेंजरच्या विंडोमध्ये तुम्हाला हवी ती सर्व व्यावसायिक संवाद, चर्चा टॉप ऑफ करून आपल्या मेन स्क्रिनवर पाहू शकता. नवीन फेव्हरेट सेक्‍शनमध्ये प्रमुख युजर्सना ठेवून ताजे चॅट्‌स, संवाद करू शकता, पाहू शकता. ब्राऊजरवर ते संवाद एका ग्रीन डॉटने तुम्हाला दिसतील.

ठळक अक्षरात फेव्हरेट सेक्‍शनमधील व्यक्तींचे ताजे संदेश दिसतील असे फेसबुकने दिलेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले असून फेसबुकच्या डेस्कटॉप व्हर्जनमध्ये जसे उजव्या कोपऱ्यात नोटीफिकेशनमध्ये ‘बर्थ डे’चा रिमाइंडर येतो तसाच आता मेसेंजरच्या अॅपमध्येही उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे फेसबुकच्या लोकप्रियतेत निश्‍चितच भर पडेल.

Leave a Comment