पॅनासोनिकचा स्वस्त, दमदार बॅटरीवाला पी ७५ स्मार्टफोन

panasonic
पॅनासोनिक ने कमी किंमतीचा तरीही दमदार बॅटरीवाला स्मार्टफोन पी ७५ सादर केला आहे. या फोनसाठी ५ हजार एएमपीची बॅटरी दिली गेली असून फोनची किंमत आहे अवघी ५९९९ रूपये. या फोनच्या खरेदीवर ग्राहकाला ३९९ रूपये किंमतीचे प्रोटेक्टीव्ह स्क्रीन गार्ड मोफत दिले जाणार आहे.

या फोनसाठी ५ इंची एचडी आयपीएस डिस्प्ले, अँड्राईड ५.१ लॉलिपॉप यूआय वर रन होणारी ओएस, ड्युअल सिम, १ जीबी रॅम, ८एमपीचा रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह तसेच ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ८ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा अशी फिचर्स दिली गेली आहेत. कनेक्टीव्हीटीसाठी थ्रीजी, वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस, मायक्रो यूएसबी अशी ऑप्शन्स आहेत. हा फोन शँपेन गोल्ड, सँड बॅक कव्हर मध्ये उपलब्ध करून दिला गेला आहे.

Leave a Comment