लग्नानंतर का वाढते वजन?

shadi1
लग्नापूर्वी मी अगदी बारीक होते पण आता मात्र वजन खूपच वाढतेय किंवा लग्नापूर्वी अगदी चवळीची शेंग होती आता लाल भोपळा झालाय अशा कॉमेंट नेहमीच ऐकायला मिळतात. म्हणजे लग्नापूर्वी अगदी प्रमाणबद्ध बांधा असणार्‍या मुली लग्न झाल्यानंतर कांही दिवसांत बेडौल होतात हे नक्की. अर्थात सर्वजणीच अशा वेट गेन करणार्‍या नसतात मात्र लग्नानंतर लठ्ठ होणार्‍या मुलींचे प्रमाण खूपच मोठे आहे. अर्थात हे कांही आपोआप होत नसते तर त्यामागेही कारणे असतातच. कोणती असतात ही कारणे?

वास्तविक भविष्यातील वजनवाढीची नांदी लग्न ठरल्याबरोबच गायली जात असते. त्याची सुरवात होते केळवणांपासून. लग्न ठरले की केळवणासाठीची आमंत्रणे येऊ लागतात व तेथे विविध पदार्थ त्यातही पक्वान्ने खाल्ली जातात. शिवाय हे खाणे अनेकदा वेळीअवेळी होत असते. लगीनघाईमुळे वेळ अपुरा पडत असतो त्यामुळे जिम व्यायाम करता येत नाहीत त्यामुळे बारकाईने पाहिले तर लग्नापूर्वीच अनेकींचे वजन १-२ किलोने वाढलेले असते.

shadi2
खाण्याची ही मौजमजा लग्नानंतरही सुरू राहते. मित्र मैत्रिणी, पाहुणे राऊळे, श्रमपरिहार या निमित्ताने पुन्हा एकदा खादडी सुरूच राहते. हनीमूनचा काळ तर आराम मौजमस्तीचा असतो. या काळातच जरूरीपेक्षा जास्त खाणे होते. परिणामी शरीरातील कॅल्शियम व बी व्हीटॅमिनचे प्रमाण घटते. त्यामुळे एनर्जी कमी होते व पुन्हा खाण्यावरच सारा भर दिला जातो. संशोधन असेही सांगते की लग्नापूर्वीपेक्षा लग्नानंतरचा बीएमआयही जास्त असतो. रिलेशनमध्ये असण्यानेही वजनवाढ होते कारण या काळातही विविध ठिकाणी भटकताना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ पोटात ढकलले जात असतात.

shadi
लग्नानंतरचे आयुष्य आणखीच वेगळे असते कारण त्यामुळे इमोशनल आणि हार्मोनल बदल होत असतात. हे बदलही वजनवाढीस कारणीभूत ठरतात. लग्नापूर्वी स्वतःचे कोष्टक स्वतःच्या सोयीनुसार बनविलेले असते ते बदलते. लग्नापूर्वीचे स्वातंत्र्य कमी होते व अन्यांच्या मताप्रमाणे आपल्या प्राथमिकता बदलत जातात. नवर्‍याच्या आवडीचे पदार्थ करण्याकडे कल वाढतो त्याचवेळी नवरोबाही बायकोसाठी बाहेरून खास पदार्थ मागवून तिला खूष करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे ओव्हर इटिंग होते. परिणाम वजनवाढ.

मुलेबाळे प्रपंचात आली की महिलांचे बॉडीक्लॉकच बदलते. खाण्यापिण्याच्या वेळा अनिश्चित होतात. वेळीअ्वेळी तसेच एकावेळी पोटभरीचे समाधान न मिळाल्याने भूक शमत नाही त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा खाण्याकडे प्रवृत्ती होते. खाणे, झोप, व्यायाम, फिटनेस यासाठी वेळ मिळेनासा होतो त्यातच घरातल्या जबाबदार्‍या व अन्य कामेही उरकावी लागत असतात. त्यामुळे दमणूक होते व व्यायाम करण्याचा उत्साह ओसरतो. याचाही परिणाम वजनवाढीत होतो.

Leave a Comment