२४० एस्कॉर्ट साईट्स हटवणार गुगल

porn
नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलला अश्लील साहित्य प्रसारीत करणाऱ्या सुमारे २४० एस्कॉर्ट साईट्स हटवाव्या लागणार असून इंटरनेटवरील अश्लिलतेबद्धल भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने निर्णय घेतला असून, त्याबाबतचे निर्देशही दिले आहेत.

याबाबत मंत्रालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, या वेबसाईट त्वरीत हटविण्यात याव्यात अन्यथा २००९च्या कायद्यन्वये या संकेतस्थळांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, भारत सरकारने अशा प्रकारचे पाऊल उचलण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. भारत सरकारने यापूर्वीही अनेक वेळा याबाबत प्रयत्न केले होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे अडचणी येत होत्या. परिणामी या वेबसाईट सूरूच राहिल्या होत्या.

सरकारने बंद करण्यास सांगितलेल्या वेबसाईटमध्ये प्रामुख्याने pinkysingh.com, jasmineescorts.com, onlyoneescorts.com, payalmalhotra.in, localescorts.in, pearlpatel.in, kavyajain.in, xmumbai.in, shimi.in and anchu.in या बेबसाईट्सचा समावेश आहे.

Leave a Comment