रोजगाराच्या संधी देण्यात पुणे सहाव्या क्रमांकावर

vacancy
पुणे :राज्याची सांस्कृतीक राजधानी म्हणून ओळख असलेले पुणे नोकरीच्या संधी निर्माण करण्यात देशात सहाव्या क्रमांकावर आहे. पुण्यात ३ महिन्यात ४९ हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या. नोकरीच्या एकूण संधींमध्ये सहा टक्के वाटा हा पुण्याचा असल्याचा द असोसिएटेड चेंबर्स ऑॅफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीज ऑॅफ इंडिया संघटनेने सांगितले आहे. देशात तीन महिन्यात साडे आठ लाख नोकरीच्या संधी निर्माण झाल्या होत्या.

पुणे सदेशातील नोकरीच्या संधी निर्माण करणा-या शहरांमध्ये हाव्या स्थानावर असून पुण्यासह दिल्ली, बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकता या शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. देशात सर्वाधिक अडीच लाख नोकरीच्या संधी दिल्लीमध्ये होत्या तर अहमदाबादमध्ये सर्वात कमी म्हणजे २० हजार ५०० संधी होत्या. मुंबई या यादीत तिस-या स्थानावर असून साधारण दीड लाख संधी मुंबईत निर्माण झाल्या होत्या. बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद ही शहरे पुण्यापेक्षा आघाडीवर आहेत.कोणत्या क्षेत्रात किती संधी निर्माण झाल्या याचाही अभ्यास करण्यात आला. एकूण नोक-यांपेकी ६० टक्के संधी या माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाला पूरक असणा-या क्षेत्रात होत्या. त्या खालोखाल सेवाक्षेत्रात संधी असल्याचे दिसून आले.

Leave a Comment