OMG! ३२ मिलियन ट्विटर अकाऊंट हॅक!

twitter
मुंबई : काही दिवसांपूर्वी फेसबूकचा सर्वेसर्वा आणि संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. या घटनेला काही दिवसच होत नाही तेवढ्यात एक दुसरी मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल ३२ मिलियन ट्विटर पासवर्ड हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. लिकडसोर्स या वेबसाईटने ३,२८,८८,३०० ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला आहे. पण आमच्याकडून अकाऊंट हॅक न झाल्याचा दावा ट्विटरने केला आहे.

कोणतीही लिंक तुमच्या अकाऊंटवर आली तर त्याला ओपन करु नका. त्यामुळे तुमची माहिती लिक होऊ शकते. फ्री ऑफर असणाऱ्या लिंकपासून सावधान राहा. कोणतीही माहिती कुठेही विचारली तर भरु नका.

Leave a Comment