
मुंबई : मधुमेह, कर्करोग आणि उच्च रक्तदाब आणि इतरही आजारांवरच्या तब्बल ५६ औषधांच्या किंमती, २५ टक्क्यांनी स्वस्त होऊ शकतात. हा महत्त्वपूर्ण निर्णय ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्रायजिंग अथॉरिटीने घेतला आहे. दर महिन्याला अनेक मधुमेह, कॅन्सर आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण या औषधांवर हजारो रुपये खर्च करतात. मात्र नॅशनल फार्मास्युटिकल प्रायजिंग अथॉरिटीच्या या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ग्लूकोज आणि सोडियम क्लोराइड इंजेक्शनच्या छोट्या पॅकची किंमत वाढवण्यात आली आहे. तर मोठ्या डोसच्या पॅकच्या किंमतीत कपात केली गेली.
स्वस्त होणार मधुमेह, कँसरचेही औषध
एबॉट हेल्थकेअर, सिप्ला, ल्यूपिन, एलेम्बिक, एलकेम लैबोरेटरीज, नोवार्टिस, बायोकॉन, इंटास फार्मास्युटिकल्स आणि सन फार्मास्युटिकल्स या कंपन्यांच्या औषधांना नव्या किंमती लागू होणार आहेत. आजच्या काळात आहारापेक्षाही औषध महत्त्वाचे झाल्यामुळे आगामी काळात दर कपात केलेल्या ५६ औषधांचा आकडा आणखी वाढणे गरजेचे आहे.
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही
