जगात अव्वल राहणार भारताचा विकासदर

gdp
नवी दिल्ली : भारताचा विकासदर यंदाच्या आर्थिक वर्षातही जगात अव्वल राहण्याचा अंदाज असून भारताने मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात चीनला मागे टाकत ७.६ टक्क्यांचा विकासदर गाठला आहे.

यंदाच्या जीडीपीने आधीच्या वर्षातल्या ७.२ टक्क्यांनाही मागे टाकले आहे. विशेष म्हणजे जानेवारी ते मार्च या तिमाहीत जगभरातल्या अर्थव्यवस्था अस्थीर असताना भारताने मात्र ७.९ टक्क्यांचा विकासदर कायम राखण्यात यश मिळवले आहे. या आकडेवारीमुळे पुढच्या आठवड्यात जाहीर होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावरचा दबाव काहीसा कमी झाला आहे. जीडीपीचे आकडे समाधानकारक असले तरी गुंतवणुकीचा टक्का मात्र घटला आहे. गतवर्षीच्या ४.९ टक्क्यांवरून हा आकडा ३.९ टक्क्यांवर खाली आला आहे. तसेच उत्पादन वाढही ११.५ टक्क्यांवरून ९.३ टक्क्यांवर आली आहे.

Leave a Comment