सॅमसंगच्या गॅलेक्सी सी सिरीजचा पहिला स्मार्टफोन लाँच

samsung
मुंबई : सॅमसंगने गॅलेक्सी सी या सिरीजचा पहिला स्मार्टफोन गॅलेक्सी सी५ बाजारामध्ये लाँच केला आहे. हा फोन ३२जीबी आणि ६४ जीबी व्हेरीएंटमध्ये उपलब्ध होणार आहेत. या गॅलेक्सी सी५ ची किंमत क्रमश: २२,४९१ आणि २४,५४५ अशी असणार आहे.

कसा आहे गॅलेक्सी सी५ – या स्मार्टफोनची बॉडी संपूर्णपणे मेटलची असून याचा डिस्प्ले ५.२ इंचाचा एचडी आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन १७ ऑक्टाकोर चिपसेट आणि ४ जीबी रॅम देण्यात आले आहेत. फोटोग्राफीसाठी एलइडी फ्लॅशबरोबरच १६ मेगापिक्सल तर ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्यामुळे सेल्फी लव्हर्सना हा फोन लगेचच आकर्षित करणारा आहे. हा फोन डुअल हायब्रिड सिम सपोर्ट असेल ज्यामुळे एका सिम स्लॅाटमध्ये सिम तर दुसऱ्या स्लॅाटमध्ये मेमरी कार्ड टाकू शकतो. कनेक्टीव्हीटी साठी ४जी LTE सहित वायफाय, एनएफसी, ब्लूटूथ, मायक्रो यूएसबी आणि जीपीएस आहेत. ह्याच्या बॅटरीची क्षमता २.६००mAh एवढी आहे. कंपनीचा दावा आहे की हा फोन ४जी नेटवर्कवर २३७ तासांचा स्टँडबाय बॅकअप देऊ शकते. चीनमध्ये या फोनचे बुकिंग सुरू झाले असले तरी ग्लोबल लाँच कधी होईल हे अजून सांगण्यात आले नाही.

Leave a Comment