३२७ कोटी रुपयांचा आयफोन तुम्ही पहिला आहे का ?

iphone
मुंबई: सोशल मीडियावर आतापासूनच आयफोन ७ बाबत चर्चा सुरु झाली असून कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात हायटेक फोन असा हा आयफोन असणार आहे. हा सर्वात महागडा फोन असेल असा कयास आहे. मात्र यापेक्षाही महागडा फोन आहे. ज्याची किंमत ३०० कोटीपेक्षा जास्त आहे.

falcon supernova pink diamond iphone 6 या फोनचे नाव असून २०१४ मध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला होता.
अमेरिकी लग्जरी ब्रॅण्ड फेल्कॉन आणि प्रीमियम गॅजेटसाठी प्रसिद्ध असून ३ लाख डॉलरच्या हेडफोन्सपासून अनेक महागडे गॅजेट्स या कंपनीने तयार केले आहेत.

४.५५ कोटी डॉलर म्हणजेच ३२७ कोटी रुपये किंमतीचा हा आजवरचा सगळ्यात महागडा फोन आहे. यामध्ये आयफोन ६ चे सगळे फीचर्स असून या महागड्या मोबाइल मागे लावण्यात आलेले गुलाबी डायमंड लावण्यात आले आहेत. अॅपल लोगो आणि आयफोन एन्ग्रेविंगसाठी लावण्यात आलेले डायमंड सगळ्यात महागड्या हिऱ्यांपैकी एक असून एका विमानापेक्षाही जास्त या फोनची किंमत आहे. ४० मिलियन डॉलर म्हणजे २०० कोटी एवढी एका फायटर विमानाची किंमत आहे.

काय आहेत महागड्या स्मार्टफोनचे फिचर्स:
याची स्क्रीन ४.७ इंचाची असून यात १.४ GHz ड्युल कोअरचा प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन १६, २४, १२८ जीबीच्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याचा रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सलचा, तर फ्रंट कॅमेरा १.२ मेगापिक्सलचा आहे. अद्याप एवढा महागडा कोणी खरेदी न केल्यामुळे याबाबत काहीही डेटा उपलब्ध नाही.

Leave a Comment