गुगलचे ‘एलो’ मेसेन्जिंग अॅप सुचवणार शब्द

google
आजच्या जगात स्मार्टफोनची क्रेझ जोरात असून जो तो ह्या ना त्या अॅपशी जोडले गेलेले आहेत. जसे काही अॅप हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटकच आहे. या अॅपमध्ये प्रामुख्याने व्हॉट्सअॅप , फेसबुक मेसेंजर ,हाईक आदी मेसेंजर अॅप ची चलती असून या सर्वात व्हॉट्सअॅपच आघाडीवर आहे.

त्यातच आपले स्थान टिकविण्यासाठी दिवसेंदिवस व्हॉट्सअॅप आणि तत्सम मेसेंजर अॅप वापरणारे वाढतच आहे. पण या स्पर्धेत आता जाइंट सर्च इंजिन गुगलने पुन्हा उडी घेतली असून एलो नावाचे स्मार्ट मेसेन्जिंग अॅप आणण्याची तयारी गुगलने केली आहे. गुगलने या अॅपमध्ये आर्टिफ़िशिअल इंटेलिजन्सचा वापर केल्याचा दावा केला आहे. समजा तुम्हाला एखाद्या मेसेजला रिप्लाय द्यायचा असल्यास हे अॅप तुम्हाला शब्द सुचवणार आहे. यात तुम्ही फ़क़्त योग्य शब्द निवडला जाऊ शकतो आणि त्यामुळे तुमचे टायपिंगचे श्रम वाचणार आहे. याशिवाय इतरही अनेक चांगले फिचर यामध्ये असणार आहे. सध्या या अॅपचे गुगल प्ले वर रेजिस्ट्रेशन सुरु आहे. गुगल एलो नावाने गुगल प्लेवर सर्च करून या अॅपचे रेजिस्ट्रेशन करता येते.

Leave a Comment