इंडियनाची स्काऊट सिक्सटी भारतात दाखल

indiana
नवी दिल्लीः भारतामध्ये स्काऊट सिक्सटी ही बाईक दमदार बाईक तयार करणा-या अमेरिकन कंपनी ‘इंडियन मोटरसायकल’ ने दाखल केली असून या बाईकची किंमत ११.९९ लाख रुपये एवढी आहे.

९९९ सीसीचे इंजिन इंडियन स्काऊट सिक्सटीमध्ये देण्यात आले असून जे ७६ बीचएपी पॉवर आणि ८८.८ एनएम टॉर्क तयार करण्यासाठी सक्षम आहे. यामध्ये ५ स्पीड ट्रान्समीशन प्रणाली आहे. या बाईकची विक्री जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. इंडियन स्काऊट सिक्सटी हलकी असून जी पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. स्काऊट सिक्सटी दाखल होण्यामुळे कंपनीचा भारतीय बाजारामध्ये विस्तार होण्यास मदत होणार आहे, असे पोलॅरिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पंकज दुबे यांनी सांगितले. कंपनी इंडियन स्काऊट सिक्सटीसह २०० प्रकारच्या ऍक्सेसरीज देणार आहे. ही बाईक तीन रंग, थंडर ब्लॅक, रेड आणि पर्ल व्हाईटमध्ये उपलब्ध असणार आहे.

Leave a Comment