देशातील दर तीन एटीएम मागे एक बंद अवस्थेत

atms
केंद्र सरकार तळागाळातील व त्यातही प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत बँकींग सेवा देण्यासाठी कसून प्रयत्न करत असतानाच देशात बसविल्या गेलेल्या एटीएम पैकी एक तृतीयांश एटीएम मशीन्स बंद अवस्थेत असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी कमिशनर एस.एस. मुंद्रा यांनी देशातील बहुसंख्य एटीएम शोभेची मशीन बनली असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

मुंद्रा म्हणाले देशाच्या विविध भागातील व विविध बँकांच्या ४ हजार एटीएम मशीन्सचे परिक्षण केले गेले तेव्हा त्यातील एक तृतीयांश एटीएम कार्यरत नाहीत असे दिसून आले. यामुळे ग्रामीण भागातील कोट्यावधी लोकाना बँकींग सेवा पुरविण्यात केंद्र सरकारसमोर मोठाच अडथळा निर्माण झाला आहे. अनेक एटीएम केंद्रांवर नियमाप्रमाणे अपंग लोकांसाठी सुविधा नाहीत असेही आढळले. या संदर्भात संबंधित बँकांना ताकीद दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment