नादखुळ्या सेल्फी प्रेमींसाठी मायक्रोमॅक्सने आणला नवा स्मार्टफोन

micromax
मुंबई : सेल्फीच्या नादखुळ्या लोकांसाठी भारतीय मोबाईल हॅन्डसेट निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सने एक नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

या स्मार्टफोनचे नाव ‘बोल्ट सेल्फी’ असे असून व्हाईट आणि शॅम्पेन रंगाच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन ‘फ्लिपकार्ट’ या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर उपलब्ध असेल. या ४जी एलटीई सपोर्ट स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची स्क्रीन ४.५ इंचाची असून यामध्ये १ गिगाहर्टझचं मीडियाटेक क्वाडकोर प्रोसेसरसोबत १ जीबी रॅम देण्यात आला आहे. याची इंटरनल मेमरी ८ जीबी आहे. याला तुम्ही मायक्रो एसडी कार्डाच्या साहाय्याने ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता. अॅन्ड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या या स्मार्टफोनमध्ये ड्युएल सिम सपोर्ट देण्यात आलाय. यामध्ये १७५० मेगाहर्टझची बॅटरी देण्यात आलीय. १८ तासांचा टॉकटाईम तुम्हाला यामुळे उपलब्ध होऊ शकेल. बेसिक फोटोग्राफीसाठी यामध्ये एलईडी फ्लॅशसोबत ५ मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये वायफाय, जीपीएस, मायक्रो यूएसबी आणि ब्लूटूथचाही समावेश आहे.

Leave a Comment