भारतात दाखल झाली ऑडीची आर ८ व्हि १० प्लस

audi
बंगळुरू : आपली लोकप्रिय कार आर ८ चे आर ८ व्हि १० प्लस हे नवीन व्हर्जन जर्मनीची लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीने भारतात लाँच केले आहे. ही गाडी किकेटर विराट कोहली आणि ऑडी इंडियाचे प्रमुख जो किंग यांनी लाँच केली. या गाडीची नवी दिल्लीतील ऑन-रोड किंमत २ कोटी ६४ लाख ठेवण्यात आली आहे.
audi1
ऑडी आर ८ व्हि १० प्लसमध्ये ५.२ लीटरचे एफएसआय क्वाट्रो मिड इंजिन लावण्यात आल्यामुळे ६ हजार ५०० आरपीएमवर ६१० अश्वशक्तीची ताकद आणि ५६० एनएमचा टॉर्क तयार होतो. गाडीची कमाल वेगमर्यादा ३३० कि.मी. प्रती तास असल्याचा दावा ऑडीने केला आहे. या गाडीत ७ स्पीड एस-ट्रानिक शिफ्ट-बॉय-वायर ट्रान्समिशन सिस्टीम आणि हाय परफॉर्मन्स सेरेमिक ब्रेक लावण्यात आले आहे. यात ऑडी ड्राइव्ह डायनॅमिक हँडलिंग सिस्टीम लावण्यात आली आहे.

आर ८ व्हि १० प्लस या गाडीचा लुक रेसिंग कारसारखा आहे. ही गाडी उच्च दुर्घटना संरक्षण, उत्कृष्ट हँडलिंगसह वजनाने मात्र हलकी आहे. या गाडीत सिंगलप्रेम रेडिएटर ग्रिल, लो एअरोडायनॅमिक्स रूफ, एल. ई. डी. हेडलाईट्स आणि १९ इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या गाडीमध्ये ८ एअरबॅग्ज लावण्यात आल्या आहेत. सेरेमिक ब्रेक्समुळे गाडी अतिशय जलद रोखली जाते. याशिवाय या गाडीत ई. एस. सी. (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलायझेशन कंट्रोल) हे तंत्रज्ञान देखील देण्यात आले आहे. कारचे स्टेयरिंग व्हील एका मिनी कॉम्प्यूटरसारखे असून इंजिन चालू-बंद करणे, ड्रायव्हिंग डायनामिक्स, गिअर बदलणे यासारखे कंट्रोल्स यावरच दिले आहेत. ही 2 आसनी कार असून आसने खाली-वर करता येतात.

Leave a Comment