गिनीजबुकात २ किमी लांबीच्या पिझ्झाची नोंद

pizza1
नॅपल्ज – जगातील एक लोकप्रिय इटालियन खाद्यपदार्थ म्हणजे पिझ्झा हा आहे. मैद्याच्या गोल लाटलेल्या पोळीवर टोमॅटो पेस्ट व चीझ फासून त्यावर विविध तर्‍हेची टॉपिंग्स कापून पिझ्झा बनवण्यासाठी ठेवली जातात व भट्टीमध्ये भाजले जाते. जगभर अनेक प्रकारचे गरम गरम शाकाहारी, अन्डाहारी व मांसाहारी पिझ्झे बनवले जातात. इटलीमध्ये नेपोलिटन पिझ्झाच्या स्वयंपाक्यांनी अश्याच प्रकारे २ किमी लांबीचा पिझ्झा बनवला असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या पिझ्झाची नोंद करण्यात आली आहे. नॅपल्ज या शहराच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या हायवे वर १८ मे रोजी हा पिझ्झा बनवण्यात आला. २ किमीचा पिझ्झा बनवण्यासाठी सामानही प्रचंड प्रमाणात लागले.
pizza
२०० लिटर तेल, २००० किलो मैदा २ किमीच्या पिझ्झासाठी वापरण्यात आला. २००० क्लो मैदा भारतात एखाद्या लग्नकार्यातत वापरला जातो. त्याचप्रमाणे १,६०० किलो टोमॅटोज्चा वापर करण्यात आला. २००० किलो इटालियन चीझचा वापर करण्यात आला. पिझ्झाचे आकर्षण तरुण पिढीत प्रकर्षाने आढळते. नेपोलिटन पिझ्झाच्या कंपनीने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवली असावी.

Leave a Comment