होंडा भारतातील सर्वात मोठी स्कूटर निर्यात कंपनी

honda
यंदाच्या वर्षात सर्वाधिक स्कूटर निर्यात करून होंडा मोटरसायकल व स्कूटर इंडिया कंपनी सर्वात मोठी निर्यातदार कंपनी बनली आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षात कंपनीने गतवर्षीच्या तुलनेत ३२.६८ टक्के अधिक निर्यात वाढ नोंदविली आहे. या वर्षात कंपनीने १,०३,२४२ स्कूटर निर्यात केल्या आहेत. होंडाची स्पर्धक हिरो कॉर्पने यंदाच्या वर्षात ७७५२१ स्कूटर निर्यात केल्या असल्या तरी त्यांच्या निर्यातीत गतवर्षीच्या तुलनेत ३ टक्के घट झाली आहे.

वर्ष २०१४-१५ मध्ये हिरो सर्वात मोठी निर्यातदार कंपनी होती. त्यावर्षी हिरोने ७९९५६ युनिट निर्यात केली होती तर होंडाने ७७८१४ युनिट निर्यात केली होती. यंदा मात्र होंडाने हिरोवर आघाडी घेतली आहे. हिरो कॉर्प ही भारतातील सर्वात मोठी दुचाकी वाहननिर्मिती कंपनी असून त्यांनी नुकताच कोलंबिया येथेही त्यांचा कारखाना सुरू केला आहे. ही कंपनी आशिया, अमेरिका, आफ्रिकेतील ३० हून अधिक देशांत दुचाकी निर्यात करते.

Leave a Comment