हँडीक्राफ्ट निर्यातीत १५ टक्के वाढ

handi
दिल्ली- भारतातून होत असलेल्या एकूण निर्यातीत कांहीशी घट दिसत असली तरी भारतीय हँडीक्राफ्ट व्यवसायाच्या निर्यातीत १० ते १५ टक्के वाढ दिसून आली आहे. उन्हाळा सीझनमध्ये भारतीय हँडीक्राफटला अमेरिकेतून मोठी मागणी आहे. आणि ही मागणी पुरी करण्यास ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्यांचेही मोठे सहाय्य मिळते आहे. त्यातच गतवषी केंद्र सरकारने केलेली व्याजदर कपात, ड्यूटी ड्राॅ बॅक मुळेही ही निर्यात वाढण्यास हातभार लागला असल्याचे एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल फॉर हँडीक्राफ्टचे व्यवस्थापकीय संचालक राकेश कुमार यांनी सांगितले.

फेब्रुवारी महिन्यात अमेरिका, युरोप, लॅटीन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथून सर्वाधिक ऑडर्स आल्या आहेत आणि छोट्या शहरातील हँडीक्राफ्ट व्यावसायिकांच्या मालाला अमेझॉन, इबे, स्नॅपडील, क्राफ्टव्हिले, फ्लिपकार्ट यासारख्या ई कॉमर्स कंपन्यांनी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याने या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळू शकली आहे. त्यातून नव्या नव्या शॉपिंग साईट व मोठ्या संख्येने नागरिकांच्या हाती पोहोचलेले स्मार्टफोन्स याचाही या व्यवसाय वाढीला उपयोग होत आहे.

चीनपेक्षाही भारतीय हँडीक्राफ्टची गुणवत्ता व क्वांटिटी सरस आहे. त्यात चीन छोट्या ऑर्डर्स घेत नाहीत. भारतातून मात्र छोट्या ऑर्डर्स घेऊनही माल निर्यात केला जातो. त्यातून सरकारने कर्ज स्वस्त केल्याने या क्षेत्रात चीनला तगडी टक्कर देणे शक्य झाले आहे असेही राकेश कुमार यांनी सांगितले.

Leave a Comment