‘ईपीएफ’च्या व्याजदरात वाढ

epfo
नवी दिल्ली – आर्थिक वर्ष २०१५-१६ साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या व्याजदरात वाढ करण्यात आली असून आता ८.८ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय विश्‍वस्त मंडळ (सीबीटी) आणि केंद्रीय कामगार मंत्रालयाने ईपीएफवर २०१५-१६ या वर्षासाठीचा व्याजदर ८.८ टक्के द्यावा, अशी शिफारस केली होती. परंतु निधीअभावी केवळ ८.७ टक्के दराने व्याज देणे शक्‍य असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले होते. त्यावर कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध करत हा निर्णय कर्मचाऱ्यांच्याविरुद्ध विरोधी असल्याची टीका केल्यामुळे या निर्णयात बदल करण्यात आला असून आता २०१५-१६ या वर्षासाठी ८.८ टक्के दराने व्याज आकारण्यात येणार आहे. यापूर्वीही कामगार संघटनांच्या विरोधामुळे सरकारला पीएफ संदर्भातील निर्णय मागे घ्यावे लागले आहेत. त्यामध्ये पीएफची रक्कम काढण्यासंबंधीच्या नियमांचा नियमाचा समावेश होता.

Leave a Comment